ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

योग आणि युद्धाचे एकाचवेळी समर्थन करतो – बाबा रामदेव

नवी दिल्ली, दि. ११ - भारतात योग आणि युद्धाच्या एकीकरणामुळे आनंद पसरेल आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा होईल, असे योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हटले असून योग आणि युद्धाचे मी एकाचवेळी समर्थन करतो, असे देखील रामदेव बाबा म्हणाले. रामदेव बाबा यांनी हे विधान भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

रामदेव बाबा यांनी योग आणि युद्धाचे समर्थन करताना या दोन्ही गोष्टी एकाचवेळी व्हायला हव्यात असे म्हटले. हिंदुस्तानात योग व्हावा आणि सीमेवर पाकिस्तानासोबत योग आणि युद्ध व्हावे. योग केल्याने हिंदुस्तानात आनंद पसरेल आणि सीमेवरील योग आणि युद्धामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घालता येईल, असे रामदेव बाबा यांनी म्हटले.

सध्या मोठ्या प्रमाणात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमधील संवादाची दरी कुलभूषण जाधव प्रकरण आणि सीमारेषेवरील वाढता तणाव यामुळे रुंदावली आहे. वारंवार पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. भारतीय जवान त्यामध्ये शहीद होत असल्याने देशात संतापाचे वातावरण आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याने भारतीयांमध्ये संतापाची भावना आहे.

पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणातही आडमुठी भूमिका घेतली आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. १६ वेळा कॉन्स्युलर अॅक्सेससाठी भारताने विनंती करुनही भारतीय राजदूतांना जाधव यांना भेटण्याची परवानगी पाकिस्तानने नाकारली आहे. पाकिस्तानच्या या आडमुठ्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानेदेखील चपराक लगावली आहे. कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. पाकिस्ताने हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे.