ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

फयाजच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, पोलिसांकडून पोस्टर जारी

नवी दिल्ली, दि. १२ - जम्मू-काश्मीर पोलिसांना भारतीय लष्कराचा जवान उमर फयाजची क्रूरपणे हत्या करणाऱ्या हिजबुल मुजाहिदीनच्या तीन संशयित दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात यश आले असून पोलिसांनी या तिन्ही दहशतवाद्यांचे फोटो असलेले पोस्टर जारी केले आहेत. त्याचबरोबर या दहशतवाद्यांबद्दल माहिती देणाऱ्यांना इनाम देण्यात येणार असल्याची घोषणा देखील पोलिसांनी केली आहे. या संशयित दहशतवाद्यांचे पोस्टर शोपियामध्ये ठिकठिकाणी लावलेले आहेत.

याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, भारतीय लष्कराचा जवान उमर फयाजची इश्फाक अहमद ठोकर, गयास-उल-इस्लाम आणि अब्बास अहमद बट या तिन्ही संशयित दहशतवाद्यांनी क्रूरपणे हत्या केली आहे. याआधी सुरक्षा यंत्रणांनी गुरुवारी लेफ्टनंट फयाज याच्या हत्येमागे सहा दहशतवादी असल्याचा दावा केला होता. दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील राजपुताना रायफल्सचा अधिकारी २३ वर्षीय फयाज रहिवासी होता आणि कुलगाममधील आपल्या नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यासाठी गेला होता. फयाजचे नातेवाईकाच्या घरातून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. फयाज डिसेंबर २०१६ मध्ये लष्कराच्या सेवेत रुजू झाला होता.

याबाबत सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, एका हत्येच्या प्रकरणात फयाजच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अब्बास अहमद बट याने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगली आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये जामिनावर सुटका झाली होती. तेव्हापासून तो फरार आहे. फयाज याच्या गावाजवळच बट राहतो. तर इतर दोन दहशतवादी अलिकडेच दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत. एक-दीड वर्षांपासूनच ते दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहेत, असे सांगितले जाते.