ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

घटस्फोटातील सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे ट्रीपल तलाक – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. १२ - सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीमांमधील तीनवेळा तलाक म्हणून घटस्फोट घेणे हा विवाह संपुष्टात आणण्याचा सगळ्यात वाईट आणि स्वीकारता येणारा प्रकार असल्याची टिप्पणी केली असून ट्रीपल तलाकला मुस्लीमांमधील काही विचार परंपरा कायदेशीर मानत असल्या तरी ही पद्धत अयोग्य असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

ट्रीपल तलाक कायदेशीर असल्याचे अशा काही वैचारीक परंपरा सांगतात. पण सरन्यायाधीश जे. एस. केहार यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने आज विवाह संपुष्टात आणण्याचा हा अत्यंत वाईट प्रकार आहे असे सांगितले आहे. या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी सुरू झाली असून आज दुसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी वैयक्तिक पातळीवर न्यायालयास माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ वकील सलमान खुर्शीद मदत करत आहेत. त्यांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये न्यायालयीन चिकित्सेची गरज नसल्याचे म्हटले असून निकाहनामामध्ये ट्रीपल तलाकला नकार देण्याची अट घालण्याची मुभा असल्याचे निदर्शनास आणले आहे.

न्यायालयाने वरील मत यावर बोलताना व्यक्त केले असून तसेच ज्या देशांमध्ये ट्रीपल तलाकला बंदी आहे अशा इस्लामी गैर इस्लामी देशांची यादी सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने खुर्शीद यांना दिले. ट्रीपल तलाकला पाकिस्तान, अफगाणिस्तान, मोरोक्को सौदी अरेबियामध्ये मंजुरी नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

मुस्लीम पिडीत महिलांची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी उभे राहिले आहेत. समानतेच्या अधिकारासह अनेक मुद्यांवर त्यांनी ट्रीपल तलाकची पद्धत किती वाईट हे रोखठोकपणे सुनावले. ट्रीपल तलाकचा अधिकार केवळ पतीला असतो, पत्नीला नसतो असे सांगत घटनेच्या १४व्या आर्टिकलने दिलेला समानतेचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला आहे.

जेठमलानी यांनी यावेळी एकाच पक्षाने एकतर्फी घटस्फोट मिळवण्याची पद्धत चुकीची असल्याने टाळायला हवी असा युक्तिवाद केला. केवळ पतीला लहर आली म्हणून पत्नीला तलाक द्यावा आणि ती भूतपूर्व पत्नी व्हावी अशा प्रकारच्या गोष्टीला कुठलाही कायदा परवानगी देऊ शकत नाही असे