ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना ओपन चॅलेंज

नवी दिल्ली, दि. १२ - देशभरात सध्या मतदानासाठी इलेक्ट्रिक व्होटिंग मशीनचा (ईव्हीएम) वापर करण्यावरून मतमतांतरे दिसून येत असून ईव्हीएमवर पराभूत पक्षांनी आक्षेप नोंदवत पुन्हा जुनी मतपत्रिकेची पद्धत अवलंबण्याची मागणी केली आहे. आम आदमी पक्ष, बसप, समाजवादी पक्ष काँग्रेससारख्या प्रमूख पक्षांचा ईव्हीएमला विरोध करण्यामध्ये समावेश असल्यामुळे शुक्रवारी निवडणूक आयोगाने देशातील ५५ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले होते. यामध्ये राष्ट्रीय पक्ष आणि ४८ प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यातील १६ पक्षांनी मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर करण्याची मागणी केली.

नवी दिल्लीच्या कॉन्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने या वेळी ईव्हीएमवर सादरीकरण केले. त्याचबरोबर राजकीय पक्षांना ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान दिले. त्यासाठी त्यांनी दोन दिवसानंतरची वेळ निश्चित केली आहे. ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवर या बैठकीत चर्चा झाली. ही बैठक ईव्हीएममध्ये फेरफार करता येत नसल्याचे सांगण्यासाठी बोलावण्यात आली होती. त्यात काही दिवसांपूर्वी दिल्ली विधानसभेत ईव्हीएम हॅकिंगचे आम आदमी पक्षाने प्रात्यक्षिकच दाखवले होते. मात्र ते ईव्हीएम नसल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला होता.

ईव्हीएम हॅकिंगसाठी दोन मशीन असतील, एका मशीनमध्ये डेटा असेल तर दुसऱ्या मशीनमध्ये कोणताही डेटा नसेल. या दोन ईव्हीएममध्ये गडबड असल्याचे राजकीय पक्षांना सिद्ध करावे लागेल. मशीन उघडता ती हॅक करावी लागेल.