ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकिस्तानबाबत बोलणार नाही करून दाखवू – राजनाथसिंह

नवी दिल्ली, दि. १६ - पाकिस्तानच्या हद्दीतून होणारे दहशतवादी हल्ले आणि पाक सैनिकांकडून भारतीय जवानांच्या विटंबना या पार्श्वभूमीवर सरकार काही बोलू इच्छित नाही; मात्र ठोस कारवाई करून दाखवू; अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. सरकार हातावर हात धरून शांत बसले आहे; असे कृपया समजू नये. आम्ही देशवासीयांची मान शरमेने झुकू देणार नाही; अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पाकिस्तानकडून होणाऱ्या निर्घृण कारवाया आणि दहशतवादाला घातले जाणारे खतपाणी याचा जबाब सरकार कसा देणार; या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ म्हणाले की; याबाबत सविस्तर बोलणे योग्य होणार नाही. ‘जे जास्त बोलतात; ते फार काही करून दाखवू शकत नाहीत. आमचा कृतीवर विश्वास आणि भर आहे. भारतीय जनतेचे दु: आणि संताप सरकारला कळतो आहे. आमच्याही काळजात वेदना आहेत. मात्र या वेदना आम्ही फार काळ मनातच ठसठसत दाबून टाकणार नाही; असेही ते म्हणाले.

भारतीय सैन्य सीमापार पाकिस्तानात घुसून दहशतवादी आणि पाक सैन्याला प्रत्युत्तर देणार का; या सवालाला उत्तर देताना राजनाथ यांनी स्पष्ट उत्तर देण्यास नकार दिला. मात्र लक्षवेधी कारवाई (सर्जिकल स्ट्राईक) करण्यासाठी १० ते १५ दिवस तयारी करावी लागते; असे ते म्हणाले. सरकार पाकिस्तानबाबत काही करता शांत बसले आहे; असे नये. आम्ही त्याचे उत्तर कृतीतूनच देऊ; असेही त्यांनी स्पष्ट केले.

सैन्याधिकारी उमर फैय्याझ यांना विवाह समारंभातून अपहरण करून ठार मारण्याच्या दहशतवाद्यांच्या कृत्याने देशवासीयांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. ते तरुणांचेआयकॉनहोते. असले भेकड कृत्य करणाऱ्या अतिरेक्यांना धडा शिकविल्याखेरीज राहणार नाही; असा इशाराही त्यांनी दिला.

देशातील माओवाद्यांच्या दहशतवादी कारवायांमध्ये मागील वर्षांपासून ४० ते ४५ टक्के घट झाली असून आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांमध्ये तब्बल ४५० टक्के वाढ झाली आहे; असा दावाही त्यांनी केला