ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गेस्ट हाऊसबाहेर आयपीएस अधिकाऱ्याचा मृतदेह

लखनौ, दि. १७ - लखनौमधील हजरतगंज या उच्चभ्रु परिसरातील मीराबाई गेस्ट हाऊसबाहेर एक आयएएस अधिकारी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. या मृत आयएएस अधिकाऱ्याचं नाव अनुराग तिवारी असून ते कर्नाटक कॅडरचे आहेत. आज सकाळी .४० वाजता मीराबाई गेस्ट हाऊसजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी मिळालेल्या ओळखपत्रावरुन मृतदेह आयएएस अनुराग तिवारी यांचा असल्याचं स्पष्ट झालं, असं पोलिसांनी सांगितलं.

अनुराग तिवारी उत्तर प्रदेशातील बहराईचचे रहिवासी होते. बंगळुरुच्या खाद्य आणि पुरवठा विभागाचे आयुक्त होते. अनेक वरिष्ठ अधिकारी मीराबाई गेस्ट हाऊसवर पोहोचले असून तपास सुरु आहे. त्यांचे फोन कॉल्सही तपासले जात आहेत. अनुराग तिवारी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनुराग तिवारी २००७ बॅचचे आयएएस होत. काही वृत्तानुसार पत्नीसोबत त्यांचे वाद सुरु होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, गेस्ट हाऊसपासून केवळ ५० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती आणि नाकातून रक्तही वाहत होतं. तीन डाक्टरांचं पथक त्यांचं पोस्टमॉर्टेम करेल.