ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कार्ती चिदंबरमविरोधात ईडीही दाखल करणार एफआयआर

नवी दिल्ली, दि. १८ - माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम याच्याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केल्यानंतर आता मनी लाँडरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयही (ईडी) कार्ती यांच्यासह आयएनएक्स मीडियावर एफआयआर दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाकडून (एफआयपीबी) मंजुरी मिळवून विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप या दोघांवर आहे. दरम्यान, सोमवारी सीबीआयनेही कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर दाखल केला होता.

सीबीआयच्या एफआयआरची प्रत आम्हाला मिळाली असून लवकरच काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर दाखल करणार आहोत, अशी माहिती ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली. सीबीआयने या दोघांविरोधात ईडीने केलेल्या छापेमारीत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे एफआयआर दाखल केला होता. एअरसेल-एक्सिस प्रकरणात याआधीच कार्ती यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांची वासन हेल्थकेअरमध्ये विदेशी गुंतवणूक केल्याच्या प्रकरणातही चौकशी सुरू आहे. दरम्यान, ईडीने एफआयआर दाखल केल्यास याप्रकरणात कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त होण्याची शक्यता वाढली आहे, असेही बोलले जाते.