ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

हेग, दि. १८ (वृत्तसंस्था) - आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला मोठा दणका दिला असून अद्याप जाधव हे हेर आहेत की नाहीत हे सिद्ध झाल्याचे सांगत जाधव हेरॉचे एजंट असल्याचा पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला आहे. पाकिस्तानने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी अंतिम निकाल येईपर्यंत करू नये, असा महत्त्वपूर्ण निकाल आज, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास पाकिस्तानवर कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. भारताने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली होती. जाधव यांना मार्चला अटक करून हेरगिरी विध्वंसक कारवायांच्या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. तसेच त्यांच्याकडून जबरदस्तीने जबाब घेण्यात आला, असा दावा भारताने न्यायालयात केला होता.

न्यायालयाने भारताच्या याचिकेवर फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते. भारताची बाजू वकील हरीश साळवे यांनी मांडली होती. भारताने जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क साधण्याची विनंती सोळा वेळा केली होती. पाकिस्तानने ती फेटाळली होती. त्यामुळे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असून, पाकिस्तानने मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचे साळवे यांनी न्यायालयात सांगितले होते.

भारताने केलेला दावा पाकिस्तानने फेटाळून लावला होता. जाधव हे हेरच असून, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे भारताला देता आलेली नाहीत, असे पाकिस्तानने म्हटले होते. पाकिस्तानने सुनावणीदरम्यान जाधव यांची चित्रफित प्रदर्शित करण्याची परवानगी मागितली होती. भारतासाठी आपण हेरगिरी करत होतो, अशी कबुली जाधव यांनी दिल्याचे त्या चित्रफितीत दिसत होते. ही चित्रफित प्रदर्शित करण्यास न्यायालयाने पाकला परवानगी नाकारली होती. पाकसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने लवकरच निकाल देऊ, असे सांगितले होते.