ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

विजय मल्ल्याचं १०० कोटींचं फार्महाऊस ईडीकडून जप्त

नवी दिल्ली, दि. १९ - भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला ईडीनं दणका दिला आहे. ईडीने मल्ल्याचे अलिबागमधील सुमारे १०० कोटी रुपयांचे फार्म हाऊस ताब्यात घेतले आहे. मांडवा येथे समुद्र किनाऱ्यालगत मल्ल्याचे १७ एकरच्या जागेवर अलिशान फार्महाऊस आहे. गेल्यावर्षी या फार्म हाऊसवर तात्पुतरी जप्तीची कारवाईदेखील करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी फार्म हाऊसमध्ये राहणाऱ्यांना ईडीने जागा खाली करण्याची नोटीस दिली होती.

ईडीच्या मुंबईतील पथकाने मल्ल्याचे अलिशान फार्म हाऊस बुधवारी जप्त केले. या मालमत्तेची किंमत ईडीने २५ कोटी रुपये असल्याचे म्हटले असले तरी बाजारभावानुसार याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. मल्ल्याकडून एसबीआय बँकेला ६ हजार ९६३ कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने १४११ कोटींची संपत्ती जप्त केली होती.

दुसरीकडे कर्जबुडव्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टानं काही दिवसांपूर्वी दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी मल्ल्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच १० जुलैला मल्ल्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. दरम्यान, देशभरातील प्रमुख बँकांना जवळपास हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला १८ एप्रिल रोजी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्याला वेस्टमिंस्टर न्यायालयासमोर हजर केलं होतं. पण न्यायालयानं त्याची जामीनावर मुक्तता केली होती.