ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हवाई दल प्रमुखांचे जवानांना तयार राहण्याचे आदेश

नवी दिल्ली, दि. २० - दिवसेंदिवस सध्या सर्वच स्तरांवर पाकिस्तानसोबतचा तणाव वाढत चालला असून हवाई दलाचे प्रमुख बी एस धनोआ यांनी यादरम्यान १२ हजार जवानांना एक पत्र लिहिले असून जवानांना या पत्रात सध्याची वर्तमान परिस्थिती लक्षात घेता शॉर्ट नोटीसवर कोणत्याही ऑपरेशनसाठी तयार राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे पत्र ३० मार्च रोजी लिहिण्यात आले आहे. बी एस धनवा यांची स्वाक्षरीदेखील या पत्रावर आहे. अनेक मुद्द्यांचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. जवानांसाठी हवाई दल प्रमुखाने पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Sub-Conventional Threat चा उल्लेख धनोआ यांनी पत्रात करत जवानांनी आपल्या प्रशिक्षणावर लक्ष देण्याचा उल्लेख केला आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार या शब्दाचा वापर पाकिस्तानकडून छेडण्यात येणा-या प्रॉक्सी वॉरसाठी केला जातो.

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रातून इशारा देण्यात आला आहे की मर्यादित साधनांमध्ये पुर्ण तयारी करुन ठेवा. हवाई दलाकडे लढाऊ विमानांची संख्या कमी आहे. हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या ४२ स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. मात्र त्यांची संख्या कमी झाली असून फक्त ३३ राहिले आहेत.