ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कसाबपेक्षाही मोठा दहशतवादी कुलभूषण जाधव – परवेझ मुशर्रफ

नवी दिल्ली,दि. २० (वृत्तसंस्था) - आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्याने पाकिस्तानचा जळफळाट झाला असून पाकिस्तानी नेत्यांची या निर्णयावर आगपाखड सुरू असतानाच आता माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनीही तारे तोडले आहेत. भारताने २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यात फासावर चढवलेल्या अजमल कसाबपेक्षा कुलभूषण जाधव हे मोठे दहशतवादी असल्याचे ते बरळले आहेत. अजमल कसाब हा एक दहशतवादीच होता, अशी कबुलीच त्यांच्या अशा बरळण्याने अप्रत्यक्षपणे दिली आहे. 

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, असा निर्णय दिला आहे. पाकिस्तानने न्यायालयाच्या या निर्णयानंतर आगपाखड करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने न्यायालयाचा हा निर्णय अमान्य असल्याचे म्हटले होते. या निर्णयानंतर पाकिस्तानचे अनेक नेतेही न्यायालयावर राग व्यक्त करत आहेत. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनीही आता या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मुंबई हल्ल्याप्रकरणी भारताने फासावर लटकवलेल्या अजमल कसाबपेक्षाही कुलभूषण जाधव मोठे दहशतवादी आहेत, असे मुशर्रफ म्हणाले आहेत. कसाब हा फक्त प्यादा होता. पण जाधव यांचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात असू शकतो. अनेकांचा त्यांनी बळी घेतला असावा. मग सर्वात मोठा गुन्हेगार कोण? असे अजब तर्कट त्यांनी मांडले.