ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी नाही

नवी दिल्ली, दि. २२ (वृत्तसंस्था) - भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत फाशी देण्यात येणार नाही, असे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी सांगितले आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाणे फाशीची शिक्षा सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अंतिम निकाल येईपर्यंत फाशी देता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अथवा माहिती मिळाली नव्हती. फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली असली तरी, जाधव हे सुरक्षित आहेत किंवा नाहीत, याबाबत जाणकारांनीही शंका उपस्थित केली होती. पण आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत जाधव यांना फाशी देण्यात येणार नाही, असे पाकिस्तानी उच्चायुक्त बासित यांनी सांगितले आहे. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानकडून हे पहिलेच आश्वासन देण्यात आले आहे.