ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकमधील नागरिकाची मोदींना ठार मारण्यासाठी ५० कोटींची सुपारी

नवी दिल्ली, दि. २२ (वृत्तसंस्था) - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या रडारवर असून पाकिस्तानातून एका अज्ञात व्यक्तीने मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यातील कुशल सोनी नावाच्या व्यक्तीला फोन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना २५ मे रोजी मुंबईत होणा-या रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्यासाठी ५० कोटी रुपयांची सुपारी ऑफर देण्यात आली असल्याची माहिती अज्ञात फोनकर्त्याने दिली असून, तो पाकिस्तानातून बोलत असल्याचे सांगितले आहे. त्या अज्ञात पाकिस्तानी व्यक्तीने +७९६५१२१९ या नंबरवरून फोन केला होता.

पोलिसांत कुशल सोनी या व्यक्तीने लेखी तक्रार दिली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. त्या फोन कॉलचा अधिक तपास पोलीस करत आहेत. सध्या तरी पोलिसांचा सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू आहे. तत्पूर्वी मध्य प्रदेशमधील इंटेलिजन्सने उत्तर प्रदेश पोलिसांना अलर्ट केले होते की, दहशतवादी भगवा वेश परिधान करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.

सतना पोलीस अधीक्षक मिथिलेश शुक्ला यांच्या मते, पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेल याचा तपास करत आहेत. शनिवारी संध्याकाळी वाजून ५० मिनिटांनी सतनाच्या रामनगर रहिवाशी कुशल सोनी यांना एक कॉल आला. फोन करणा-या व्यक्तीने २५ मे रोजी मुंबईत होणा-या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बस्फोट घडवून उडवून द्यायचे आहे.

दोन लोक बॉम्बस्फोट घडवण्यासाठी तयार असून या कटात तुम्हीही सामील व्हा, असे कुशल सोनी यांना सांगण्यात आले आहे. तुम्हाला यासाठी पाहिजे तेवढी रक्कम देण्यात येईल. मात्र त्याने स्वतःचे नाव नाही सांगितले. पहिल्यांदा कुशल सोनीला वाटले कोणीतरी त्याची चेष्टा करत आहे. मात्र मोबाईल नंबर पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच हलली. त्यानंतर सोनी यांनी याची तक्रार रामनगर पोलिसांत केली आणि बोलण्याचे रेकॉर्डिंग पोलिसांना सुपूर्द केले. रामनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख मिश्रा म्हणाले, हा फोन परदेशातून आला होता. फोन करणा-याची भाषा गुजराती वाटत होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच सतनाच्या बलराम आणि राजीव नावाच्या दोन Posted On: 22 May 2017