ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आरक्षणासाठी दलितांची नेहमीच रडारड – काटजू

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) - भारतासाठी जाती व्यवस्था शाप असून, आपणाला जर विकास पाहिजे तर जात व्यवस्था उद्ध्वस्त झाली पाहिजे, असे सांगून आरक्षणासाठी दलित नेहमीच रडतो, अशी वादग्रस्त टिप्पणी माजी न्यायमूर्ती मार्कंडये काटजू यांनी केली आहे.

आज देशातील जाती व्यवस्थेवर नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून नवनव्या वादाला तोंड फोडणारे काटजू यांनी प्रहार केला आहे. जात व्यवस्था आणि जाती व्यवस्थेवर आधारित आरक्षणाने अनुसुचित जाती आणि जमातीची हानी झाली आहे, असे माझे वयक्तिक मत आहे, अशी पोस्ट काटजू यांनी फेसबुकवर टाकली आहे. आरक्षणामुळे जात व्यवस्था संपण्याऐवजी प्रबळ होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दलितांना ओळख आरक्षणाने दिली आहे. परंतु, आरक्षणामुळेच दलित समानतेसाठी संघर्ष करीत नाही, असे निरीक्षण नोंदवून संघर्ष चालू ठेवता दलित नेहमीच आरक्षणासाठी रडत असतो, अशी वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली आहे. आरक्षण मुद्दा निवडणुकांतदलित वोट बँकमुद्दा ठरतो, यात शंका नाही. हाच मुद्दा बेशरम राजकारणी हाताळतात. परंतु, आता किती दलितांनी आरक्षणाचा फायदा घेतला आहे. आरक्षणाने दलितांना वेगळे केले आहे. उच्च जातीच्या मुलाने/मुलीने जास्तीचे गुण घेतले तरी त्यांना शैक्षणिक संस्थेत किंवा सरकारी नोकरीत नाकारले जाते. या उलट दलितांच्या मुलांनी कमी गुण मिळवले तरी त्यांना संधी मिळते. त्यामुळे उच्च जात शत्रू होत चालली आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

पुढे त्यांनी असे नमूद केले आहे, की जात व्यवस्थेवर आरक्षण माझ्या मते नष्ट केले पाहिजे. सर्वांना एकसमान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि सर्वच जातीतील गरिब मुलांना सर्वप्रथम संधी द्यायला हवी, असे त्यांनी फेसबुकवर म्हटले आहे. नुकतेच कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावरून भारताचे आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणे चुकीचे आहे, असे विधान केले होते. या विधानामुळे काटजू यांच्यावर देशभरातून टीक झाली.