ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब, पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त

नवी दिल्ली, दि. २३ - घुसखोरीविरोधात भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने नौशेरामधील पाकिस्ताच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. भारतील सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल अशोक नरुला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सैन्याने नौशेरामधील कारवाईचा व्हिडीओदेखील जारी केला आहे. मेच्या कारवाईचा हा व्हिडीओ आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या चौक्या लष्कराने तोफगोळयाचा वर्षाव करुन उद्ध्वस्त केल्यात.

पाकिस्तानचं लष्कर घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा दावाही भारताने केला आहे. बर्फ विरघळल्याने आणि पास खुले झाल्याने घुसखोरचं प्रमाण वाढल्याचं शक्यता आहे, असंही अशोक नरुला म्हणाले.

नरुला म्हणाले की, शेजारच्या देशाने सीमेवरील घुसखोरी थांबवावी. आम्ही नुकतीच नौशेरामध्ये जी कारवाई केली ती घुसखोरीविरोधात होती. ही कारवाई आमच्या दहशतवादविरोधी अभियानाचा भाग आहे. काश्मीरमध्ये आम्हाला शांतता हवी आहे. यासाठी सीमेवरील घुसखोरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरुन दहशतवाद्यांची संख्या कमी होईल आणि राज्यातील तरुणाई चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सीमेवर अशाप्रकारची कारवाई करतच असतो.

भारताने उरी हल्ल्याच्या ११ दिवसांनंतर मागील वर्षी २९ सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेकी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता, ज्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. १८ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैन्याच्या कॅम्पवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते.