ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उत्तर प्रदेशमध्ये प्राप्तिकर विभागाचे सनदी अधिकाऱ्यांच्या घर, कार्यालयांवर छापे

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) - आज प्राप्तिकर विभागाने उत्तर प्रदेशच्या सनदी अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली असून राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसहित अधिकाऱ्यांच्या २२ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. हे छापे मेरठ, बागपत, दिल्ली, नोएडा आणि गाझियाबाद येथे मारण्यात आले. गाझियाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी विमल शर्मा यांच्या घरावरही छापे मारण्यात आले. सध्या नोएडा अथॉरिटीमध्ये शर्मा हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर मेरठच्या आरटीओ ममता शर्मा त्यांचे पती विमलकुमार, बागपतचे तत्कालीन जिल्हाधिकारी हृदय शंकर तिवारी यांच्या घरावरही छापा मारला आहे. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागात तिवारी सध्या कार्यरत आहेत. आपल्या निवेदनात छापा मारल्याच्या वृत्तास प्राप्तिकर विभागाने दुजोरा दिला आहे. यूपी सरकारमधील नोकरशहाशी निगडीत प्रकरणांसाठी ही छापेमारी करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.

याबाबत प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी हृदय शंकर तिवारी यांच्याविरोधात दिल्ली, लखनऊ, मेरठ, बागपत, ग्रेटर नोएडासहित ठिकाणी छापा टाकण्यात आला. आयएएस अधिकारी विमलकुमार शर्मा आणि त्यांची पत्नी ममता शर्मा यांच्या मेरठ, नोएडा आणि मेनपुरी येथील सुमारे जागांवर छापे मारण्यात आले. राज्याचे विशेष सचिव (तुरूंग) सत्येंद्र कुमार यांच्याही लखनऊ आणि नोएडा सहित जागांवर छापा टाकण्यात आला. सर्व ठिकाणी तपास सुरू आहे.