ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकने केला सियाचिनमधून भारताने लढाऊ विमाने उडवल्याचा दावा

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) - राजौरीतील नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याच्या भारतीय लष्कराने चौक्या उद्ध्वस्त केल्याचे जाहीर केल्यापासून पाकिस्तान सैरभैर झाल्याचे दिसत असून भारताच्या या कारवाईमुळे चिडलेल्या पाकने बुधवारी सियाचीनमधून लढाऊ विमानाचे उड्डाण केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला. पण पाकचा हा भारतीय हवाईदलाने दावा फेटाळला आहे.

अशा कोणत्याही लढाऊ विमानाचे उड्डाण भारतीय हद्दीतून झाले नसल्याचे हवाईदलाने म्हटले आहे. दरम्यान पाकिस्तानी लष्कराने आपल्या सर्व लष्करी हवाई तळांना भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर सज्जतेचे आदेश दिल्याचा दावाही पाक माध्यमांनी केला होता. सीमारेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे आणि काही दिवसांपूर्वी भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना केल्यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी ताणले गेले आहेत.