ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

मुंबईचा शेख नबी १२ वर्षांपासून पाकिस्तानातच, ISI साठी काम

इस्लामाबाद, दि. २५ (वृत्तसंस्था) - पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अटक झालेला भारतीय नागरिक शेख नबी अहमद मुंबईच्या जोगेश्वरचा रहिवासी आहे. पाकिस्तानने रविवारी त्याला अटक केली. पण धक्कादायक म्हणजे २००५ पासून तो पाकिस्तानाच आहे. मुंबई पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नबी मागील १२ वर्षांपासून पाकिस्तानात आहे, तर आवश्यक कागदपत्रं नसल्याच्या आरोपातून पाकिस्तान सरकार त्याला आताच का अटक केल्याचं दाखवत आहे, असा प्रश्न तपास यंत्रणांना पडला आहे.

इतकंच नाही तर शेख नबीवे दशकभर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयसाठी काम केलं असून अर्धाडझन भारताविरुद्धच्या कारवायांमध्ये त्याचा हात होता. काश्मीरमधून पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न फसल्यानंतर तो बांगलादेशमार्गे पाकिस्तानात पोहोचला होता, असंही अधिकाऱ्याने सांगितलं.

पोलिस अधिकाऱ्यानुसार, २००६ मध्ये गुलबर्गामध्ये एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीनंतर महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरीतील सुमारे डझनभर लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्याचवेळी तीन लोक बेपत्ता होते. यामध्ये शेख नबीही होता. तो २००५ पासून बेपत्ता होता. ज्या डझनभर लोकांना पकडलं होतं, त्यांना त्यांच्या आई-वडिलांसमोर समज देऊन सोडण्यात आलं.

पण महाराष्ट्र पोलिसांच्या विविध तपास यंत्रणा नबीसह मोठा इम्रान आणि छोटा इम्रान या दोन साथीदारांचा शोध घेत होत्या. पाकिस्तानी सीमा ओलांडताना जम्मू काश्मीर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मोठा इम्रान जखमी झाला होता. त्याआधी तिथल्या पोलिसांनी, नंतर यूपी पोलिसांनी त्याची कस्टडी घेतली होती.

दरवर्षी आमचं पथक नबीच्या घराजवळ खबरी पाठवत असे. आमच्या माहितीनुसार, तो मागील १२ वर्षात मुंबईत कधीच आला नाही. पाकिस्तानने त्याच्या ज्या फ्लॅटचा पत्ता दिला, तिथे पाच वर्षांपासून सोळंकी कुटुंब भाड्याने राहत आहे. तपासात समोर आलं की, जोगेश्वरमध्ये रामं मंदिर रोडवर त्याच्या कुटुंबाचं एक घर आहे, पण ते घरही भाड्याने दिलं आहे,” असं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.

शेख नबी आपल्या कुटुंबासह जोगेश्वरीमध्ये एका छोट्या घरात राहत असे. या परिसरात लोक त्याला ताज नावाने ओळखत असत. शेख नबी १२ वर्षांपासून बेपत्ता आहे. स्थानिक पोलिस जवळपास दररोज शेख नबीच्या शोधात त्याच्या घरी येतात. त्यामुळे कुटुंबीयांनी आपल्या घराचा पत्ताच बदलला आहे. पण नबीचं कुटुंब महाराष्ट्रातच राहतं. शेख नबीवर मुंबई पोलिसात गुन्हे