ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात बंदी

बेळगाव, दि. २५ (वृत्तसंस्था) - कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधीलजय महाराष्ट्रवरून सुरु झालेला वाद अधिकच चिघळण्याची शक्यता असूनजय महाराष्ट्रच्या घोषणेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याविरोधात सीमाभागातील बांधवांनी आयोजीत केलेल्या मोर्चात शिवसेनेचे मंत्री सहभागी होणार आहेत. पण आपला अडमुठेपणा कायम ठेवत कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात प्रवेशबंदी केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिल्यामुळे आज बेळगावात होणाऱ्या मोर्चात शिवसेनेचे मंत्री उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कर्नाटक सरकारने कायदा सुव्यवस्थेचे कारण देत आदेश काढला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना या आदेशानुसार २४ ते २७ मे पर्यंत बेळगावात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार प्रवेश बंदी असली तरी, बेळगावात आज होणाऱ्या मराठी मोर्चात परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत.

कर्नाटक सरकार सीमावर्ती भागात जय महाराष्ट्र अशी घोषणा दिल्यास, लोकप्रतिनिधींचे पदच रद्द करण्याचा विचार करत असल्याचा इशारा नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी सोमवारी दिला होता. आगामी अधिवेशनात कर्नाटक सरकार कोणत्याही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागृहातजय महाराष्ट्रम्हटल्यास किंवा कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास, त्याचे पद वा सदस्यत्व रद्द करणार, असा नवीन कायदा अंमलात आणणार आहे. याबाबत मंगळवारी बेळगाव महापालिका सभागृहात बैठक घेऊन मराठी नगरसेवकांना आपण सूचना देणार असल्याचेदेखील बेग यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आज दुपारी १२ वाजता या मोर्चाला संभाजी चौकातून सुरूवात होईल. संभाजी चौकातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर विसर्जीत होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर दिवाकर रावते आणि दीपक सावंत हे दोघे जण मोर्चात सहभगी होऊन बेळगावात जय महाराष्ट्रचा एल्गार करणार आहेत.