ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अमित शहांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी – असदुद्दीन ओवेसी

हैदराबाद, दि. २६ (वृत्तसंस्था) - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवण्याचे आव्हान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिले आहे. ओवेसी अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या तेलंगणा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आपल्या दौऱ्यादरम्यान अमित शहा यांनी २०१९ साली तेलंगणात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल, असे विधान केले होते. असदुद्दीन ओवेसी यांनी या विधानाचा समाचार घेताना हैदराबादमधून आपल्याविरुद्ध अमित शहा यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. तसेच आमचा पक्ष सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातही भाजपला अस्मान दाखवण्याची काळजी घेईल, असेही त्यांनी सांगितले.

माझे शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी लक्षात ठेवावे. तुम्हाला हैदराबादची जनता तुमची जागा दाखवून देईल. भाजपच्या उमेदवाराचे गोशामहल विधानसभा मतदारसंघात डिपॉझिट जप्त होईल. तर अंबरपेट, मुर्शिदाबाद, खैरताबाद आणि उप्पलमध्येही भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागेल. एकुणच तेलंगणात भाजपचा मोठा पराभव होईल, असा दावा ओवेसी यांनी केला.

याशिवाय, भाजपचा २०१९ मध्ये हैदराबाद लोकसभा मतदारसंघात विजय होईल, या अमित शहांच्या विधानाची त्यांनी खिल्ली उडवली. भाजपला हैदराबादमध्ये विजय मिळवणे एवढे सोपे वाटते का? याठिकाणी आम्ही अनेक वर्ष काम केले आहे. याठिकाणी भाजपला निवडणूक लढवायची असेल तर खुशाल लढवू दे. माझ्याविरुद्ध या मतदारसंघात अन्य कोणता उमेदवार देण्यापेक्षा अमित शहा यांनीच लढावे, असे जाहीर आव्हान ओवेसी यांनी दिले.