ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जय महाराष्ट्र घोषणा दिल्याप्रकरणी आमदारांवर गुन्हा

बेळगाव, दि. २६ (वृत्तसंस्था) - बेळगावमध्ये काढलेल्या मोर्चात जय महाराष्ट्रसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गेल्या. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणी आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील यांच्यासह मोर्चा आयोजक आणि इतरांवरही कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जय महाराष्ट्र म्हणणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. ते म्हणण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. हिम्मत असेल तर आपली आमदारकीच रद्द करा, असे थेट आव्हानच आमदार संभाजी पाटील यांनी यावर कर्नाटक सरकारला दिले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक केंद्राने बोलवून, सीमाप्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, बेळगाव सीमेवर कर्नाटक पोलिसांची शिवसेना नेते दिवाकर रावतेंना नोटीस बजावली. सरकारी आदेशाचं कारण देत रावते माघारी फिरले. तर जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्यावरुन आमदार संभाजी पाटलांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.