ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कुलभूषण जाधव यांना लवकरात लवकर फासावर लटकवा

नवी दिल्ली, दि. २९ (वृत्तसंस्था) - पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना अटक करत फाशीची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचे फाशीचे प्रकरण प्रलंबित असतानाच त्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

या याचिकाकर्त्याचे नाव मुजामिल अली असे असून मुजामिल स्वत: वकील असून ही याचिका त्यांच्यावतीने अॅडव्होकेट फारूख नाइक यांनी न्यायालयात दाखल केली आहे. नाइक हे पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते आणि माजी सिनेट अध्यक्ष आहेत. पाकिस्तानी जनतेला त्यांच्या देशाविरोधात कट रचणा-या व्यक्तीला शिक्षा देण्याचा अधिकार असल्याचे फारूख यांनी म्हटले आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणावर पाकिस्तानच्या अंर्तगत कायद्यानुसार तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश सरकारला देण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी पाकिस्तान सरकार, गृह आणि संरक्षण खात्याचे सचिव यांना देखील प्रतिवादी केले आहे.