ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

महात्मा गांधींचा आणखी एक मारेकरी होता, सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली, दि. २९ (वृत्तसंस्था) - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आणखी एक मारेकरी होता का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत विचारण्यात आला आहे. महात्मा गांधींवर तीन गोळ्या झाडल्या होत्या असं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु नथुराम डसेव्यतिरिक्त आणखी एकाने गांधीवर चौथी गोळी झाली होती का, असे अनेक प्रश्न या याचिकेत उपस्थित केले आहेत. मुंबईतील अभिनव भारतचे विश्वस्त आणि संशोधक डॉ. पंकज फडणीस यांनी ही याचिका दाखल केली आहे.

नवा चौकशी आयोग स्थापन करुन गांधी हत्येमागील मोठं कटकारस्थान उडकीस आणावं, अशी मागणी या याचिकेत केली आहे. तसंच गांधी हत्येच्या तपासाबाबतही याचिकेत प्रश्न उपस्थित केले आहेत. गांधी हत्या हे इतिहासातील दडपलेलं मोठं प्रकरण होतं का, तसंच त्यांच्या मृत्यूसाठी विनायक दामोदर सावरकर यांना जबाबदार ठरवण्यासाठी ठोस आधार होता का, असे प्रश्न याचिकेच विचारले आहेत.

फडणीस यांच्या दाव्यानुसार, महात्मा गांधींवर चार गोळ्या झाडल्या होत्या. तिसऱ्या आणि चौथ्या गोळीमधील अंतर महत्त्वाचं आहे, कारण गोडसेने ३० जानेवारी १९४८ रोजी ज्या पिस्तूलने गांधीजींची हत्या केली होती, त्यामध्ये सात गोळ्यांची जागा होती. पण पोलिसांनी चाललेल्या चार गोळ्या जप्त केल्या होत्या. अशा परिस्थितीत हे निश्चित आहे की, त्या पिस्तूलमधून केवळ तीन गोळ्या झाडल्या. गोडसेच्या पिस्तूलमधून चौथी गोळी झाडल्याची शक्यता नाहीच. ही गोळी दुसऱ्या मारेकऱ्याच्या बंदुकीतून आली होती.

१९६६ मध्ये न्यायमूर्ती जे एस कपूर यांचा चौकशी आयोग गांधी हत्येमागील कारस्थान उघड करण्यात अपयशी ठरला होता, असं याचिकेत म्हटलं आहे. नथुराम गोडसे आणि नारायण आपटेसह अन्य आरोपींना दोषी ठरवण्यासाठी तीन गोळ्या झाडल्याचा दावा विविध न्यायालयांनी खरा मानला, यावरही फडणीस यांनी प्रश्न निर्माण केले आहेत.

महत्मा गांधींजींच्या मारेकऱ्यांना १५ नोव्हेंबर १९४९ रोजी फासावर लटकवलं होतं. तर पुराव्यांअभावी सावरकर निर्दोष ठरले. सावरकरांशी प्रेरित होऊन मुंबईत २००१ मध्ये अभिनव भारतची स्थापना झाली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम केलं जातं, असा दावा या संस्थेकडून करण्यात आला आहे.