ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

२६/११ सारखा हल्ला करण्यासाठी देशात घुसले २५ दहशतवादी

नवी दिल्ली, दि. ३० (वृत्तसंस्था) - २७ मे रोजी सीमा रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. काश्मीर खोऱ्यात २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये १० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, गेल्या वर्षी त्या चकमकीत ठार झालेल्या बुरहान वानीची साथीदार हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला होता.

देशात २६/११ मुंबई हल्ल्याप्रमाणे घातपात करण्याचा मोठा कट यामुळे बिथरलेल्या लष्कर--तोयबा या दहशतवादी संघटनेकडून रचला जात आहे. याबाबत गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोठा रक्तपात घडवण्यासाठी लष्कर--तोयबाचे जवळपास २० ते २५ दहशतवादी देशात घुसले आहेत. दहशतवाद्यांकडून रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल, पर्यटन स्थळं आणि मॉल्स यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे.

सुरक्षा यंत्रणांकडून या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमेशेजारी असणा-या राज्यांतही सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या संदेशानुसार, सर्व सुरक्षा दलांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.