ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजप नेत्याने थकवले रेल्वेचे भाडे

नवी दिल्ली, दि. ३१ (वृत्तसंस्था) - आग्र्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद सामरिया यांना रेल्वेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सामरिया यांना या नोटिसा १२ लाख रुपयांची थकित रक्कम वसूल करण्यासाठी पाठवल्या जात आहेत. २०१४ मध्ये भाजप कार्यकर्त्यांना फतेहपूर सिक्रीहून लखनऊला आणण्यासाठी सामरिया यांनी ट्रेन आरक्षित केली होती. लखनऊमध्ये २०१४साली नरेंद्र मोदी यांच्याविजय शंखनादरॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

संपूर्ण ट्रेन आरक्षित करण्यासाठी १८. लाख रुपये आकारले जाणार होते. यातील लाख रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करण्यात आले होते. त्यावेळी पक्षाच्या निधीतून भाजप नेते विनोद सामरिया यांनी ही रक्कम भरली होती. रेल्वे गाडी यानंतर भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी चार स्थानकांवर थांबवण्यात आली. त्यामुळे रेल्वेने या प्रकरणी ३०.६८ लाख रुपयांची मागणी केली. सामरिया यांनी भरलेली आगाऊ रक्कम वजा केल्यानंतर अद्याप १२. लाख सामरिया यांच्याकडे रुपये थकलेले आहेत. पक्षाने थकित रक्कम भरावी, अशी अपेक्षा सामरिया यांनी व्यक्त केली आहे. पण रेल्वेकडून ११ मे रोजी आणखी एक नोटिस बजावण्यात आल्याने सामरिया चिंताग्रस्त आहेत.

माझ्या नावाने ट्रेन आरक्षित करण्यात आली होती, असे भाजपचे फतेहपूर सिक्रीचे माजी अध्यक्ष विनोद सामरिया यांनी सांगितले. मी एक शेतकरी असून ऐवढी रक्कम भरणे मला शक्य नाही. पक्षाच्या नेत्यांना यासाठी वारंवार विनंत्या करुनही मला फक्त आश्वासने मिळाली. थकित रक्कम पक्षाने भरल्यास रेल्वेकडून माझ्या संपत्तीवर जप्ती येईल, अशी भीती वाटते, असे सामरिया यांनी सांगितले.