ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

व्हॅलेंटाईन डेमुळे बलात्कार आणि महिला अत्याचारांना प्रोत्साहन - इंद्रेशकुमार

जयपूर, दि. ३ (वृत्तसंस्था) - पाश्चिमात्य देशांनी प्रेम आणि स्त्री पुरुष संबंधांचे पावित्र्य ओलांडून त्यांनाव्हॅलेंटाईन डेसारख्या माध्यमातून धंदेवाईक स्वरूप प्रदान केले आहे. त्यामुळेच बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि महिलांबाबत हिंसाचाराच्या प्रकारांना प्रोत्साहन मिळत असल्याची मुक्ताफळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी इंद्रेशकुमार यांनी उधळली आहेत.

रास्व संघाच्या स्वयंसेवक प्रशिक्षण वर्गाचा समारोप इंद्रेशकुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

भारतीय परंपरेने प्रेम आणि स्त्री पुरुष संबंधांना पवित्र मानले आहे. त्यामुळे त्याचे जाहीर प्रदर्शन करणे हे भारतात असभ्यतेचे मानलं जाते. मात्र पाश्चात्य देशात प्रेमाचा बाजार मांडण्यात येतो. व्हॅलेंटाईन डे सारखे दिवस साजरे करणे हे त्याचेच प्रतीक आहे. त्याच्या मागेलागून अशा दिवसांच्या निमित्ताने आपल्या भोग आणि वासनांचे जाहीर प्रदर्शन मांडता त्याचे पावित्र्य राखावे; असे आवाहनही त्यांनी केले.