ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उत्तर प्रदेशमध्ये २२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बरेली, दि. ५ (वृत्तसंस्था) - राज्य परिवहन मंडळाच्या बसला उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये ट्रकसोबत झालेल्या भीषण अपघातात २२ प्रवाशांचा होरपळून मॄत्यू झाला आहे. ट्रकची धडक लागताच बसने पेट घेतला होता. २२ प्रवाशांचा आगीच्या भडक्यात होरपळून मृत्यू झाला. तसेच इतर १५ जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. बसला लागलेली आग ऐवढी भयंकर होती, की काही क्षणांतच बस पूर्णपणे भस्मसात झाली. ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

हा अपघात बरेली जिल्ह्यातील बिथरीचैनपूर परिसरात घडला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रविवारी रात्री उशीरा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२४ वर दिल्लीहून बस येत होती. सुत्रांच्या माहितीनुसार, चुकीच्या बाजूने बस येत होती. त्यामुळे, लखनौच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक बसली. ट्रकची धडक लागताच बसच्या डीझेल टँकमध्ये स्फोट झाला. यानंतर लागलेल्या आगीत काही क्षणांतच बसचा कोळसा झाला.

या आगीची माहिती मिळताच पोलिस आणि अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बसचा कोळसा झाला होता. घटनास्थळावर पोलिस अधीक्षकांसह इतर पोलिस अधिकारी हजर असून सविस्तर तपास केला जात आहे.