ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पॅरिस करारावर स्वाक्षरी पैशांसाठी नाही तर पर्यावरणासाठी केली – सुषमा स्वराज

नवी दिल्ली, दि. ६ (वृत्तसंस्था) - भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पॅरिस करारावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. आम्ही पॅरिस करारावर स्वाक्षरी आर्थिक लाभासाठी किंवा इतर कोणत्याही लोभापायी केली नाही असे म्हणत सुषमा स्वराज यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले आहे.

हवामान बदलासंबंधातील पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी हा निर्णय घेण्यामागे अमेरिकेच्या हितांना बाधा पोहचत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, यामुळे भारत आणि चीनला याचा सर्वाधिक फायदा होईल, असेही ट्रम्प यांनी सांगितले होते.

सोमवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेत चीन, पाकिस्तान आणि परराष्ट्र धोरणावर भाष्य केले. सुषमा स्वराज पाकिस्तान आणि काश्मीरविषयी म्हणाल्या, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने त्यासंदर्भात तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्यावर पॅरिस करारावर स्वाक्षरी करण्यासाठी कोणताही दबाव नव्हता. हा करार म्हणजे आमच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. आजही आमच्याकडे ग्रामीण भागात नद्यांचे पूजन केले जाते. या कराराच्या माध्यमातून केवळ मदत निधी मिळावा, या अपेक्षेने या करारावर भारताने स्वाक्षरी केली नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडताना भारतावर टीका केली होती. पण याचे भारत- अमेरिका संबंधांवर परिणाम होणार नाही असे स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. कझाकस्तानमध्ये होणाऱ्या परिषदेत शरीफ आणि मोदी यांच्यात भेट होण्याची चर्चा होती. पण अद्याप दोन्ही बाजूंनी या भेटीविषयी काहीही ठरलेले नाही असेही सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.