ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार

नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था) - केंद्रीय निवडणूक आयोग आज राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोग तारखांची घोषणा करणार आहे. देशाचा पुढचा राष्ट्रपती कोण असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे, त्यामुळे या महाइलेक्शनकडे देशाचं लक्ष लागलं आहे.विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या २५ जुलैला संपत आहे. त्यामुळे २५ जुलैपूर्वी निवडणुक आयोगाला राष्ट्रपतीपदाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि युपीए दोघांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काही महत्त्वाची नावं राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत होती. यात शरद पवार यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जात होतं. मात्र वेळोवेळी राष्ट्रवादीकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला. नुकत्याच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत घेतलेल्या बैठकिला १७ पक्ष हजेरी होते. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी काँटेकी टक्कर होण्याची चिन्ह आहेत.

दरम्यान एनडीएकडून संघाची पार्श्वभूमी असलेला व्यक्ती राष्ट्रपदासाठी उमेदवार असू शकतो असं बोललं जात आहे. तर काँग्रेस महात्मा गांधींचे नातू गोपाळ कृष्ण गांधींना उमेदवारी देऊ शकते. असं झाल्यास संघ विरुद्ध गांधी अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे.