ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारताशी चर्चेसाठी पाकवर वाढता दबाव

अस्ताना, दि. ८ (वृत्तसंस्था) - शांघाय को-ऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताशी ताणलेले संबंध सुधारण्यासाठी चर्चा करण्याचा दबाव पाकिस्तानवर वाढत आहे. दहशतवादाला प्रोत्साहन थांबविल्याशिवाय चर्चा नाही; अशी भारताची ठाम भूमिका असली तरीही पाकिस्तानने चर्चेसाठी पुढाकार घ्यावा यासाठी अनेक देशांकडून आग्रह होत आहे.

शांघाय को-ऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या आणि जून रोजी होणाऱ्या शिखर बैठकीत भारत आणि पाकिस्तानला पूर्णवेळ सदस्यत्व प्रदान करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सदस्य राष्ट्रांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध असावे; अशी अट या करारात नसली; तरीही भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेद्वारे परस्पर विसंवाद मिटविण्याच्या प्रयत्नांची कोंडी फोडावी; अशी सदस्य राष्ट्रांची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाक पंतप्रधान नवाझ शरीफ हे दिवस या बैठकीसाठी अस्ताना येथे असणार आहेत. भारत चर्चेला उत्सुक नसला आणि त्यासाठी पुढाकार घेण्याची पाकिस्तानची तयारी नसली तरीही दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी ठरविल्यास परस्पर चर्चेसाठी त्यांना या दोन दिवसात वेळ मिळू शकतो. कझाकिस्तानचे राष्ट्रपति नूरसुलतान नजरबायेव यांच्या मेजवानीला दोन्ही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देश शक्यता नाकारत असले; तरीही मोदी शरीफ यांच्यात चर्चा होणार का; या बाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्सुकता आहे.

दहशतवाद आणि चर्चा यांच्यात मेल असू शकत नसल्यामुळे मोदी अस्ताना येथे शरीफ यांना भेटणार नाहीत; असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. मात्र कुलभूषण जाधव फाशीप्रकरणी आनंतरराष्ट्रीय पातळीवर सुरुवातीला तरी पराभवाची चव चाखावी लागल्यानंतर भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे.