ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उत्तर कोरियाने घेतली क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी

सेऊल, दि. ८ (वृत्तसंस्‌था) - गुरुवारी सकाळी जमिनीवरून जहाजांवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी उत्तर कोरियाने केल्याची माहिती, दक्षिण कोरियाच्या संयुक्त चीफ्स ऑफ स्टाफ (जेसीएस) ने दिली. सकाळी लवकर प्योंगयांगच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या वॉनसन शहरातून कमी पल्ल्याचे जहाज क्रूज मिसाईल लाँच केले, असे जेसीएसने एका निवेदनात म्हटले आहे. हे मिसाईल उत्तर कोरियाच्या पूर्व किनारपट्टीच्या २०० किमीच्या अंतरावरुन उडाले. या चाचणीवर दक्षिण कोरिया आणि अमेरिका संयुक्तपणे लक्ष ठेवून असून त्याचा तपशील जमा करुन विश्लेषण करणार आहेत.

पूर्ण सुरक्षा सज्जता राखताना दक्षिण कोरियन लष्कराने अतिरिक्त प्योंग्यांगच्या संरक्षणासाठी दक्षता घेणार असल्याचे जेसीएसने म्हटले आहे. यूएन सिक्युरिटी काउंसिलच्या ठरावांनुसार, प्योंगयांगला कोणत्याही क्षेपणास्त्राची किंवा क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास बंदी आहे.

प्योंगयांग येथे उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे अमेरिकन सैन्याने कोरियन द्वीपकल्प बंद करण्यासाठी आण्विक शक्तीवर चालणारी विमानवाहू जहाज पाठविली आहेत. स्थानिक माध्यमांच्या अहवालांनुसार, या चाचणीची माहिती तत्काळ दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मुन जे यांना देण्यात आली.