ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मोदी शरीफ भेटले, केली एकमेकांची विचारपूस

शांघाई, दि. ९ (वृत्तसंस्था) - शंाघाई को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेसाठी गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची परिषदेपूर्वी लिडर्स लाऊंजमध्ये भेट झाल्याचे सूत्रांकडून समजते. यावेळी मोदी यांनी शरीफ यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच नवाझ यांच्या माता कुटुंबियांचीही हालहवाल विचारली असे समजते. सरकारी सूत्रांकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला गेलेला नाही.

नवाझ शरीफ यांच्यावर नुकतीच हृदय शस्त्रक्रिया झाली होती त्यांनतर प्रथमच मोदी शरीफ आमनेसामने आले.कजाकिस्तानच्या राजधानीत अस्ताना येथे या दोघांची लीडर्स लाऊंजमध्ये भेट झाली मात्र या दोघांत वेगळी मुलाखत होणार नसल्याचे सूत्रांकडून स्पष्ट केले गेले. यापूर्वी रशियातील उफा येथे २०१५ च्या ब्रिक्स संमेलनात मोदी शरीफ यांची चर्चा झाली होती त्यानंतर भारत पाक संबंध सरळीत होतील अशी आशाही व्यक्त करण्यात आली होती. मात्र परिस्थिती अधिकच बिकट बनल्याने दोन्ही देशांतील संबंध अधिक तणावग्रस्त बनले आहेत. दरम्यान मोदीं चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचीही भेट घेणार असल्याची चर्चा जोरात आहे.