ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गाय ही आई समान, हैदराबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली, दि. १० (वृत्तसंस्था) - शुक्रवारी गायीबाबत एक मोठे वक्तव्य हैदराबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यामुर्तींनी केले असून राष्ट्रीय पशुचा दर्जा गायीला मिळायला हवा, असे न्या. बी. शिवाशंकर राव यांनी म्हटले आहे. गाय ही भारताची पवित्र राष्ट्रीय वारस असल्याचे सांगत गाय ही आई आणि देव समान असल्याचे म्हटले. राजस्थान उच्च न्यायालयानेही काही दिवसांपूर्वीच गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्याबाबत म्हटले होते.

न्यायमुर्तींनी हे वक्तव्य पशुपालक रामावत हनुमा यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना केले. रामावतने आपल्या जप्त करण्यात आलेल्या ६३ गायी परत मिळवण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली होती. पण त्याचे अपील कनिष्ठ न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आपल्या गावाजवळील कंचनपल्ली या गावात गायींना चरण्यासाठी नेले होते, असे रामावतने न्यायालयाला सांगितले होते. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने रामावत हा गायी विकण्यासाठी घेऊन जात असल्याचा आरोप केला. बकरी ईद दरम्यान गोमांस विकण्याचा त्याचा इरादा होता, असे न्यायालयाला सांगितले होते. न्या. बी. शिवाशंकर राव यांनी रामावत हनुमाचे अपिल रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिला.

बकरी ईदवेळी मुस्लिमांना धडधाकड गायींना मारून त्यांचे मांस खाण्याचा कोणताही कायदेशीर अधिकारी नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीचा हवाला त्यांनी दिला. त्याचबरोबर त्यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील जनावरांच्या डॉक्टरांना इशारा दिला आहे. चांगल्या गायींना दूध देण्यास अकार्यक्षम ठरवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. गाय दूध देण्यास समर्थ नाही, असे डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिल्यास त्या गायीला कत्तलखान्यात नेण्याची आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये परवानगी आहे.