ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारतीयांनी विजय माल्ल्याला दिले खास सरप्राईज

लंडन, दि. १२ (वृत्तसंस्था) - टीम इंडियाची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये भारतीय बँकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय माल्ल्या हा दाखल झाला खरा पण त्याचे त्यावेळी स्वागत प्रेक्षकांनी निराळ्या प्रकारे करण्यात आले. विजय माल्ल्या सध्या सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला पण त्याला एक वेगळचे सरप्राईज मिळाले.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही मॅच पाहण्यासाठी भारतीय बँकांचं कोट्यावधी रुपयांच कर्ज बुडवून परदेशात आरामात राहणारा विजय माल्ल्या ओव्हल मैदानात दाखल झाला. पण त्यापूर्वी स्टेडियमबाहेरच भारतीय प्रेक्षकांनी त्याला पाहताचचोर, चोर…’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. अचानक घडलेला प्रकार पाहून विजय माल्ल्याही गोंधळून गेला आणि त्याने शांत राहणेच पसंत केले.