ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्मृती इराणींवर गुजरातमधील शेतकऱ्याने फेकल्या बांगड्या

अमरेली, दि. १३ (वृत्तसंस्था) - शेतकरी आंदोलनाची महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील धग आता गुजरातमध्येही पसरल्याचे दिसत असून सोमवारी त्याचा अनुभव केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना आला. काल संध्याकाळी स्मृती इराणी यांचा कार्यक्रम गुजरातच्या अमरेली येथे आयोजित करण्यात आला होता. त्या व्यासपीठावर यावेळी भाषण करत असताना त्यांच्या दिशेने केतन कासवाल या तरूणाने बांगड्या फेकल्या. पोलिसांनी या घटनेनंतर केतनला लगेचच ताब्यात घेतले. पण या घटनेमुळे एकूणच देशभरात शेतकऱ्यांच्या मोदी सरकारविरोधातील रोष वाढत चालल्याचे चित्र आहे.

स्मृती इराणी मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. केतन कासवाल हा यावेळी व्यासपीठापासून बऱ्याच दूर अंतरावर बसला होता. इराणी यांनी भाषणाला सुरूवात केल्यानंतर केतन अचानकपणे उठला. यावेळी त्याने इराणी यांच्या दिशेने दोन ते तीन बांगड्या फेकल्या. पण केतन व्यासपीठापासून दूर असल्याने त्या इराणी यांच्यापर्यंत पोहचू शकल्या नाहीत. यावेळी केतनवंदे मातरमच्याही घोषणा देत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, केतन कासवाल शेतकरी असून त्याने कर्जमाफीच्या मागणीसाठी बांगड्या फेकून सरकारचा निषेध केला. काँग्रेस पक्षाशी कासवालचा कोणताही संबंध नाही. तो बांगड्या फेकताना केवळ वंदे मातरमच्या घोषणा देत होता. पण पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासवाल याला घेऊन जात असताना स्मृती इराणी यांनी त्याला सोडून द्यायची विनंती केली होती. त्याला बांगड्या फेकू देत. मी याच बांगड्या त्याच्या बायकोला भेट देईन, असे इराणी यांनी म्हटले.