ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सध्याच्या नोटासोबत चलनात येणार पाचशे रुपयांच्या नव्या नोटा

नवी दिल्ली, दि. १३ (वृत्तसंस्था) - पाचशे रुपयांची नवी नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाजारात आणणार असून पाचशे रुपयांच्या नव्या नोटांवर हे इनसेट अक्षर असणार आहे. पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा पाचशे रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्यावरही चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती. पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे चलनातून बाद झाल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर जारी केलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा चलनात कायम राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेकडून आता चलनात आणल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांची रचना सध्या चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांसारखीच असणार आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटा महात्मा गांधी (नव्या) मालिकेतील असणार आहेत.

रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांनी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्यानंतर इतर कोणत्याही मूल्यांच्या नोटा बाजारात आणण्याचा मानस नसल्याचे म्हटले आहे. लोकांनी कॅशलेस व्यवहार करावेत, यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहितीदेखील विश्वनाथन यांनी सांगितले. केंद्र सरकारचा पाच हजार आणि दहा हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा कोणताही विचार नसल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेला दिली आहे.