ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रामदेव बाबांना भोवले प्रक्षोभक भाषण

रोहतक, दि. १५ (वृत्तसंस्था) - योगगुरु रामदेव बाबा यांच्या अडचणी जाहीर सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी वाढल्या असून रामदेवबाबांविरोधात हरियाणातील रोहतकमधील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. ऑगस्ट रोजी याप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

रामदेवबाबा यांनी एप्रिल २०१६ मध्ये रोहतकमध्ये जाट आंदोलनाच्या वेळी भाषण केले होते. भारताच्या संविधानाचा आम्ही आदर करतो. अन्यथा भारत मातेचा अनादर करणाऱ्या हजारो, लाखो लोकांचा शिरच्छेद करण्याची ताकद आमच्यात असल्याचे रामदेवबाबांनी त्यावेळी म्हटले होते. हरियाणातील माजी मंत्री सुभाष बत्रा यांनी या विधानावरुन न्यायालयात धाव घेतली होती. गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिल्याने ते न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता.

रोहतकमधील अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरीष गोयल यांच्यासमोर बुधवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. यापूर्वी न्यायाधीशांनी रामदेवबाबा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढले होते. तसेच त्यांना समन्स बजावले होते. रामदेवबाबा न्यायालयात दोन्ही वेळेला सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने बुधवारी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले.