ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अयोध्येतील मुस्लिमांनी गाईचे दूध पिऊन सोडला रोजा

अयोध्या, दि. १६ (वृत्तसंस्था) - अयोध्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मुस्लिम गट असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे (एमआरएम) इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या मुस्लिमांनी गाईचे दूध पिऊन रोजा सोडला. मुस्लिमांनी या इफ्तार पार्टीत आम्ही गोमांस खाणार नाही, असा निर्धारही व्यक्त केला.

अयोध्येत मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. मंचातर्फे मुस्लिमांना या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या पार्टीत सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांनी गाईचे दूध पिऊन रोजा सोडला. आरोग्यासाठी गाईचे दूध उत्तम असून, त्यामध्ये वैद्यकीय गुण आहेत, हे मुस्लिमांनी मान्य केले आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि मंचाचे आश्रयदाते इंद्रेशकुमार यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी गाई पाळण्याचे महत्त्वही मुस्लिमांना पटवून सांगितले. गोहत्येला इस्लामसह कोणत्याही धर्मात परवानगी नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी इंद्रेश कुमार यांनी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरही भाष्य केले. मातेच्या चरणात स्वर्ग आहे. या स्वर्गात तलाक मान्य नाही, असेही ते म्हणाले. गोहत्येच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी इस्लामसह कोणत्याही धर्मात गोहत्या मान्य नाही. यापुढे बीफ खाणार नाही, असेही मुस्लिमांनी मान्य केल्याचे इंद्रेश कुमार यांनी सांगितले. याशिवाय मोगल सम्राट बाबर हा घुसखोर होता, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. बाबर मोगल होता. तो घुसखोर होता. त्याला इस्लामबद्दल काहीही माहिती नव्हते, असेही इंद्रेश कुमार म्हणाले.