ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

बलात्कारप्रकरणी गायत्री प्रजापतींना १० कोटी रुपयांचा जामीन

इलाहाबाद, दि. १९ (वृत्तसंस्था) - बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या अखिलेश सरकारमध्ये मंत्री राहिलेले गायत्री प्रजापती यांना मिळालेल्या जामीनविषयी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. गायत्री प्रजापती यांना या गुन्ह्याप्रकरणी जामीन मिळण्यासाठी १० कोटी रूपये दिले गेल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भातील माहिती इलाहाबाद न्यायालयाच्या एका चौकशीत मिळाली आहे. एका वृत्तपत्रानुसार, प्रजापती यांना कट आखत जामीन दिला गेला असल्याची माहिती बाहेर आली आहे. इलाहाबाद उच्च न्यायालयचे मुख्य न्यायाधीश दिलीप बी भोसले यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर प्रजापतींना मिळालेल्या जामीनविषयी चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. सुनावणी आणि न्यायाधीशांच्या बदलींमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती या चौकशीत समोर आली आहे.

इलाहाबाद उच्च न्यायायलयाच्या न्यायाधीश भोसले यांनी केलेल्या चौकशीच्या अहवालात सांगितले की, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मिश्रा हे निवृत्त होण्याआधीच आठवड्यापूर्वीच त्यांची नियुक्ती बाललैंगिक प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) न्यायाधीश पदावर करण्यात आली आहे. यानंतर न्यायाधीश . पी. मिश्रा यांनी गायत्री प्रजापती यांना २५ एप्रिलला बलात्कारप्रकरणी जामीन दिला होता. मिश्रा यांच्या नियुक्तीविषयी शंका येत असून त्यांची नियुक्ती ही एका जबाबदार न्यायाधीशाला हटवून करण्यात आली असल्याचे न्यायाधीश भोसले यांनी सांगितले.