ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

१ जुलै पासूनच लागू होणार जीएसटी – अरुण जेटली

नवी दिल्ली, दि. १९ (वृत्तसंस्था) - आपल्याकडे वस्तू आणि सेवा कराची तारीख पुढे ढकलण्याचा वेळ नसल्यामुळेच जीएसटी परिषदेच्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर जुलैपासूनच लागू करण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जीएसटी जुलैपासून लागू करण्याची मागणी असोचेम या देशातील मोठ्या उद्योग संघटनेने केली होती. ही मागणी फेटाळून लावत जुलैपासूनच आम्ही जीएसटी लागू करणार असे, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केले आहे.

असोचेमने नवी करप्रणाली लागू करण्यासाठी आणखी थोडा वेळ घ्यावा असे शनिवारी म्हटले होते. या संस्थेने यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना पत्र लिहून वस्तू आणि सेवा करांची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यास आयटी विभाग यासाठी पूर्णपणे तयार नसल्यामुळे करदात्यांना वस्तू आणि सेवा कर भरताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. मात्र असोचेमची ही मागणी फेटाळण्यात आली आहे. सरकार आणि कंपन्यांना वेगाने होणाऱ्या सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी सुरक्षेचे कठोर उपाय योजले पाहिजेत असे मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.