ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रुग्णालयाकडून नवजात बाळ मृत घोषित, पण अंत्यसंस्कारावेळी जिवंत

नवी दिल्ली, दि. १९ (वृत्तसंस्था) - राजधानी दिल्लीतल्या शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर सारेच आवाक झाले आहेत. कारण या रुग्णालयात नवजात बाळाला त्याच्या जन्मानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पण अंत्यसंस्कारावेळी ते अर्भक जिवंत असल्याचं समोर आलं. या घटनेनं सारेच आवाक झाले असून, रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात बदरपूरमधील एका महिलनेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. पण या बाळाची कोणतीच हलचाल होत नसल्याचं पाहून डॉक्टरांनी, त्याला मृत घोषित केलं. आणि बाळाच्या वडिलांना त्याचा मृतदेह एका बॉक्समध्ये पॅक करुन दिला.

यानंतर कुटुंबियांनी त्याच्यावर अंत्यसंस्काराची तयार सुरु केली. पण त्याचवेळी बाळाच्या आत्त्याला त्याची हलचाल जाणवली. यानंतर डॉक्टरांनी पॅक करुन दिलेल्या बाळाला त्या बॉक्समधून बाहेर काढलं, त्यावेळी ते जिवंत असल्याचं दिसून आलं.

कुटुंबियांनी तत्काळ बाळाला आपोलो रुग्णालयात दाखल करुन त्याची तपासणी केली. अन् नंतर पुन्हा सफदरजंग रुग्णालयात ते बाळ दाखल केलं. यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत, रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाची तक्रार दाखल केली.

दरम्यान, या प्रकरणी सफदरजंग रुग्णालयाच्या प्रशासनानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. पण दुसरीकडे त्या बाळाला मृत घोषित करण्यापूर्वी एक तास डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचं एका डॉक्टरानं सांगितलं.