ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा कर्जमाफीच्या घोषणेनंतर यू टर्न

चंदीगढ, दि. २० (वृत्तसंस्था) - राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी विधानसभेत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. त्यांनी या घोषणेनंतर शेतकऱ्यांची वाहवा मिळवली, पण काही काळातच त्यांच्यावर पुन्हा टीकाही सुरु झाली.

अल्पभूधारक म्हणजे एकरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज पंजाब सरकार माफ करणार आहे, अशी घोषणा कॅप्टन अमरिंदर सिंहांनी केली. पण जे पत्रक मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आले, त्यामध्ये वेगळेच काही तरी सांगण्यात आले होते. शेतकरी कोणताही असो, केवळ लाख रुपयांपर्यंतच कर्ज माफ केले जाईल, असे पत्रकामध्ये म्हटले असल्यामुळे सभागृहाच्या बाहेर येताच अमरिंदर सिंहांचा हा निर्णय बदलल्याचे दिसून आले. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे अमरिंदर सिंहांनी सांगितले होते. विशेष म्हणजे त्यांनी पेपरवर लिहिलेले भाषण वाचून दाखवले होते. मात्र त्यांच्या भाषणाची प्रतही पत्रकारांना देण्यात आली नाही.