ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीसाठी शवासन करावे लागेल – दिग्विजय सिंह

नवी दिल्ली, दि. २१ (वृत्तसंस्था) - आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. योगाचे कार्यक्रमांचे देशासह जगभरातील अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनाशवासनकरावे लागेल, असा टोला दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने काँग्रेस नेते शहजाद पुनावाला यांनी मोदी सरकारला ट्विटच्या माध्यमातून प्रश्न विचारला होता. कर्जमाफी आणि हमीभाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणते आसन करावे, असा प्रश्न शहजाद पुणावाला यांनी उपस्थित केला होता. दिग्विजय सिंह यांनी या प्रश्नालाशवासनअसे उत्तर दिले. दिग्विजय सिंह यांनी पुनावाला यांच्या प्रश्नाला ट्विटरच्या माध्यमातून उत्तर देत अप्रत्यक्षपणे मोदी सरकरावर शरसंधान साधले.

काँग्रेसचे शहजाद पुनावाला यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या समस्यांवरुन मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी ट्विटरचा वापर केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमीभाव मिळावा, यासाठी आसन आहे का? मोदी यांच्या आश्वासनाचा काहीच उपयोग नाही, असे पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. दिग्विजय सिंह यांनी पुनावाला यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. ‘शवासनया एकाच शब्दात उत्तर देत दिग्विजय सिंह यांनी मोदींवर निशाणा साधला.