ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

इस्रोच्या ३१ उपग्रहांचे काउंटडाऊन सुरू

चेन्नई, दि. २२ (वृत्तसंस्था) - उपग्रह कार्टोसॅट हे भारतीय हवामानाचे निरीक्षण करण्यास अवकाशात सोडण्यात येणार असून यासोबत अन्य ३० उपग्रहसुद्धा अवकाशात झेप घेणार आहेत. हे ३१ उपग्रह शुक्रवारी सकाळी अवकाशात सोडण्यात येणार असून या मोहिमेचे २८ तासांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने दिली.

अवकाशात सोडण्यात येणाऱ्या या उपग्रहांपैकी कार्टोसेट हे भारतीय उपग्रह असून अन्य ३० उपग्रह हे परदेशी आहेत. हे उपग्रह अवकाशात पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) च्या मदतीने झेप घेणार असून कार्टोसॅट- सीरीज या उपग्रहाचे वजन ७१२ किलोग्राम आहे. सकाळी वाजून २९ मिनिटांनी पीएसएलव्ही या प्रक्षेपकामार्फत हे ३१ उपग्रह एकाचवेळी अंतराळात प्रक्षेपण करणार आहेत.