ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राजीव गांधींच्या मारेकऱ्याला हवे दयामरण

नवी दिल्ली, दि. २२ (वृत्तसंस्था) - तामिळनाडू सरकारला पत्र पाठवून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या रॉबर्ट पायस याने दयामरण देण्यात यावे, अशी विनंती केली आहे. गेल्या २६ वर्षांपासून तुरुंगात आहे आणि आता जगण्याला काहीही अर्थ उरलेला नाही, असे त्याने पत्रात म्हटले आहे.

रॉबर्ट पायस याला १९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो मागील २६ वर्षांपासून तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. रॉबर्टला अटक झाली त्यावेळी तो अवघ्या २० वर्षांचा होता. २६ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या रॉबर्टने आता तामिळनाडू सरकारकडे दयामरण मिळावे, अशी विनंती केली आहे. माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. मला जगायचे नाही. न्याय मिळेल ही आशा संपुष्टात आल्यामुळे मला दयामरण द्यावे, अशी विनंती करणारे पत्र त्याने तामिळनाडू सरकारला पाठवले आहे.