ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महाराष्ट्राचे दोन जवान पाकच्या ‘बॅट’ हल्ल्यात शहीद

जम्मू काश्मीर, दि. २३ (वृत्तसंस्था) - पाकिस्तान लष्कराने पून्हा एकदा नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय जवानांवर हल्ला केला असून भारतीय लष्कराचे दोन जवान पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यात शहीद झाले आहेत. महाराष्ट्रातील हे दोघेही जवान रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्राचे दोन जवान पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यात शहीद झाले आहेत. या हल्ल्यात औरंगाबादचे रहिवासी असलेले नाईक संदीप जाधव आणि कोल्हापूरचे रहिवासी असलेले शिपाई श्रावण बाळकू माने शहीद झाले असून हा हल्ला पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (बॅट) केला आहे.

जम्मूमधील पुंछ विभागात गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास बॅटच्या टीमने नियंत्रण रेषेच्या आत घुसखोरी केली. यानंतर भारतीय सैन्यावर हल्ला केला. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनीही या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. एका हल्लेखोराला ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. तर एक सैनिक जखमी झाला. पाकने केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सुपुत्र नाईक संदीप जाधव (औरंगाबाद) आणि शिपाई सावन माने (कोल्हापूर) हे दोघे जण शहीद झाले. ३५ वर्षीय संदीप जाधव गेली १५ वर्ष लष्कराच्या सेवेत होते, तर २५ वर्षीय माने वर्षांपूर्वी सेवेत रुजू झाले होते.