ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

यावेळी राष्ट्रपती निवडणूक ही केवळ औपचारिकताच

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) - राष्ट्रपती पदासाठी १७ जुलै रोजी होणारी निवडणूक मतांचे बालंबाल पाहता केवळ औपचारिकताच ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीतील एकूण मतसंख्येच्या ६२ टक्के मते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे आहेत; तर विरोधी आघाडीकडे ३४ टक्के मते आहेत. त्यामुळे रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे चांगलेच जड आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयासाठी उमेदवाराला एकूण मतांच्या ५० टक्के मते मिळविणे आवश्यक आहे. एकूण मतसंख्येच्या ४० टक्के मते एकट्या भाजपाकडे आहेत. रालोआतील भाजपच्या सहयोगी पक्षांची मते लक्षात घेता ही टक्केवारी ४८ टक्क्यांपर्यंत जाते. याशिवाय अण्णा द्रमुक ( टक्के), बिजू जनता दल ( टक्के) तेलंगणा राष्ट्र समिती ( टक्के), जनता दल युनायटेड (सुमारे टक्के), वायएसआरसीपी आणि इंडियन नॅशनल लोक दल मिळून टक्के यांनी कोविंद यांना पाठींबा दिला आहे. या सर्वांची बेरीज १४ टक्के होते.

या निवडणुकीत एकूण मतदान १० लाख ९८ हजार ९०३ एवढे आहे. त्यापैकी लाख ४९ हजार ४०३ मते खासदारांची; तर लाख ४९ हजार ४९५ मते आमदारांची आहेत.