ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत – ओवेसी

हैदराबाद, दि. २४ (वृत्तसंस्था) – २०१९ मधील लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक रमजानच्या महिन्यात घेण्याची योजना केंद्र सरकार आखत असून रमजानच्या महिन्यात ते जरी निवडणूक घेत असले तरीही आम्ही या निवडणुकीसाठी तयार असल्याचे मत एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे.

रमजानमधील शेवटच्या शुक्रवारच्या मक्का मस्जीद येथील कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना रमजान महिन्यात होणाऱ्या या २०१९ च्या लोकसभा निवकडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. ओवेसी पुढे म्हणाले, की मागील दशकापासून हैदराबादमध्ये लोकसभेची जागा एमआयएम जिंकत आली आहे. येथील हिंदू आणि मुस्लीम नागरिकांमध्ये असलेल्या एकजुटीचा हा विजय असून भाजपच्या डोळ्यात ही एकता खुपत असल्यामुळे केंद्र सरकार रमाजनसारख्या पवित्र महिन्यात आगामी लोकसभेची निवडणूक घेणार आहे. तरीही सर्व मुस्लीम बांधवांनी यावेळी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.