ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रमजान ईद देशभरात उत्साहात साजरी

नवी दिल्ली, दि. २६ (वृत्तसंस्था) - रमजान ईदनिमित्त आज देशभरात उत्साह दिसून येत असून मुस्लीम बांधवांनी रमजान ईदनिमित्त नमाज पठणानंतर एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. जनतेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन बंधुता शांततेसाठी प्रेरणा देणाऱ्या रमजान ईदसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जामा मशिदचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी रविवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर सोमवारी ईद साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार देशात ईद साजरी होत आहे.

मुस्लीम बांधवांनी रमजान महिन्यात ३० दिवस रोजा धरला होता. आज राजधानीत दिल्लीत मशिदीसह संपूर्ण देशातील लहान-मोठ्या सर्व मशिदीमध्ये मुस्लीम बांधवांनी नमाजाचे पठण केले. यावेळी त्यांनी देशामध्ये शांतता प्रगतीसाठी प्रार्थना केली. भोपाळमध्ये मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रसिध्द वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी वाळूमध्येईद मुबारकलिहून शुभेच्छा दिल्या आहेत. कोलकाता, अहमदाबाद, भोपाल, तामिळनाडू आणि मुंबईमध्ये ईद उत्साहात साजरी होत आहे.