ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चीनची दादागिरी, कैलास मानसरोवर यात्रा रोखली

नवी दिल्ली, दि. २७ (वृत्तसंस्था) - चीनने पुन्हा एकदा दादागिरी दाखवता भारतावर डोळे वटारले आहेत. चीनने कैलास मानसरोवर यात्रेचा मार्गच बंद केला आहे. चीनने नाथुला दर्रे रास्ता बंद केल्यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. भारत-चीन सीमेवर सिक्कीम सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांची हाणामारी झाली होती. सोमवारी याबाबतचा व्हिडीओ समोर आला होता.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारताच्या हद्दीतील सिक्कीम सेक्टरमध्ये घुसून दोन बंकर उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या जवानांमध्ये कमालीचा तणाव आहे. या तणावातून चीनने सिक्कीमच्या नाथूला दर्रेपासून होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेवरही बंदी आणली आहे. भारतातून कैलास मानसरोवरकडे जाणाऱ्या भाविकांचा मार्गही चीनने रोखला.  दरम्यान, चीनी सैनिक भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याने भारतीय सैनिकांची डोकेदुखी वाढली आहे.